संत ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग
अविचिता परिमळु झुळकला अळुमाळु ।
मी म्हणे गोपाळु आलागे माये ।
चांचरती चांचरती बाहेरी निघाले ।
ठकचि मी ठेलें काय करूं ॥१॥
मज करा कां उपचारु अधिक ताप भारु ।
सखिये सारंगधरु भेटवा कां ॥ध्रु॥
तो सांवळा सुंदरु कासे पीतांबरु ।
लावण्य मनोहरु देखियेला ॥
भरलिया दृष्टी जव डोळां न्याहाळी ।
तव कोठें वनमाळी गेलागे माये ॥२॥
बंधोनि ठेलें मन तंव जालें आन ।
सोकोनि घेतले प्राण माझेगे माये ।
बापरखुमादेविवरु विठ्ठल सुखाचा ।
तेंणें कायामनेंवाचा वेधियेले ॥३॥
- संत ज्ञानेश्वर महाराज
(संकलक : प्रसाद वैद्य)
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment