शेवटचा प्रयत्न

बोधकथा - २०

शेवटचा प्रयत्न मुख्य फोटो
शेवटचा प्रयत्न अतिरिक्त फोटो

एक पराक्रमी राजा होता. एके दिवशी एक परदेशी पाहुणा त्याच्या दरबारात आला आणि त्याने राजाला एक सुंदर दगड भेट दिला. तो दगड पाहून राजाला खूप आनंद झाला. त्या दगडापासून भगवान विष्णूची मूर्ती बनवून ती राज्यातील मंदिरात बसवण्याचा निर्णय त्याने घेतला आणि मूर्ती बनवून घेण्याचे काम त्याने राज्याच्या महामंत्र्यांकडे सोपवले.
महामंत्री गावातील सर्वोत्कृष्ट शिल्पकाराकडे गेले आणि त्याला दगड देऊन म्हणाले, 'महाराजांना विष्णूची मूर्ती मंदिरात बसवायची आहे. या दगडापासून भगवान विष्णूची मूर्ती तयार करा आणि सात दिवसांच्या आत महालात पाठवा. यासाठी तुम्हाला सोन्याची ५० नाणी दिली जातील.'
हे ऐकून शिल्पकार खूश झाला आणि महामंत्री गेल्यानंतर त्यांनी पुतळ्याचे काम सुरू करण्यासाठी आपली साधने बाहेर काढली. त्याने आपल्या एक हातोडा घेतला आणि तो दगडावर प्रहार करू लागला; पण दगड तसाच राहिला. शिल्पकाराने अनेक प्रयत्न करूनही काही उपयोग झाला नाही. ५० वेळा प्रयत्न केल्यावर शिल्पकाराने शेवटचा प्रयत्न करण्यासाठी हातोडा उचलला; पण '५० वेळा प्रयत्न करूनही काही उपयोग झाला नाही, मग आता काय उपयोग,' या विचाराने त्याने हात मागे ओढला.
मूर्तिकाराने तो दगड परत महामंत्र्यांकडे नेला आणि दगड फोडणे अशक्य असल्याचे सांगून तो परत केला. महामंत्र्यांना कोणत्याही परिस्थितीत राजाची आज्ञा पाळायची होती. म्हणून त्यांनी भगवान विष्णूची मूर्ती बनवण्याचे काम गावातील एका सर्वसामान्य शिल्पकाराकडे सोपवले. शिल्पकाराने दगड घेऊन महामंत्र्यांच्यासमोरच त्या दगडावर वार केला आणि तो एका झटक्यात तुटला.

दगड फोडल्यानंतर मूर्तिकाराने मूर्ती बनवण्यास सुरुवात केली. महामंत्री विचार करू लागले, की पहिल्या शिल्पकाराने आणखी एक शेवटचा प्रयत्न केला असता तर तो यशस्वी झाला असता आणि त्याला सोन्याची ५० नाणी मिळाली असती.

बोध : आपल्याही आयुष्यात असे प्रसंग येतात. कोणतेही काम करण्यापूर्वी किंवा कोणतीही समस्या सोडवण्यापूर्वी, आपला आत्मविश्वास डळमळतो आणि आपण प्रयत्न न करता हार मानतो. बऱ्याच वेळा आपण एक किंवा दोन प्रयत्नांत अपयशी ठरलो तर आपण पुढे प्रयत्न करणे थांबवतो. जीवनात यश मिळवायचे असेल, तर वारंवार अपयशी होऊनही यश मिळेपर्यंत प्रयत्न करणे सोडू नये. कोणास ठाऊक, आणखी एक प्रयत्न करण्यापूर्वी आपण मागे घेतलेला प्रयत्न हा आपला शेवटचा प्रयत्न असू शकतो आणि आपण त्यात यशस्वी होऊ शकतो.

Publisher: Aniket Konkar News publisher name | Date: 30-01-2026 News publication date | Time: 12:39 PM News publication time | Views: 156 Number of times this news has been viewed | District: ratnagiri Related district of the news
Publisher: Aniket Konkar News publisher name | Date: 30-01-2026 News publication date | Time: 12:39 PM News publication time | Views: 156 Number of times this news has been viewed | District: ratnagiri Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words