आचार्य महादेवबुवा वैद्य यांचा अभंग
भिल्लिणीचे प्रेमा भुलले श्रीराम ।
करिती विश्राम झोपडीत ॥१॥
पाहुनिया रूपा देहा विसरली ।
रामरूपी झाली, एकरूप ॥२॥
चाखुनिया बोरे देतसे श्रीरामा ।
भक्ताचिया प्रेमा भेद नाही ॥३॥
चरणांची धूळ लावितां कपाळी ।
पातकांची होळी झाली तेव्हां ॥४॥
धर्म जाती भेद भक्तिपाशी नाही ।
एकरूप पाही महादेव ॥५॥
- आचार्य महादेवबुवा वैद्य
(संकलक : प्रसाद वैद्य)
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment