बाह्य रूपाला भुलू नका!

बोधकथा - १९

बाह्य रूपाला भुलू नका! मुख्य फोटो
बाह्य रूपाला भुलू नका! अतिरिक्त फोटो

एका रानातल्या खडकावर दोन घोरपडी ऊन खात बसल्या होत्या. तेव्हा एक घोरपड दुसरीला म्हणाली, 'आपली स्थिती किती दुःखद आहे ना? आपण फक्त जिवंत आहोत एवढेच. सगळ्या जगात आपल्याकडे कोणी ढुंकूनही बघत नाही आणि आपली दखलही घेत नाही. आपल्या क्षुद्रतेचा धिक्कार असो. यापेक्षा वार्‍यासारख्या उड्या मारणार्‍या हरणाचा जन्म मिळाला असता, तर काय मजा आली असती ना!'

ती घोरपड हे बोलत असतानाच एका हरणामागे लागलेल्या शिकारी कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज ऐकू आला व धावून थकलेल्या हरणाचा जीव कुत्र्याने घेतलेला तिने प्रत्यक्ष पाहिला. त्यावेळी दुसरी घोरपड आपल्या स्थितीविषयी कुरकुरणार्‍या पहिल्या घोरपडीला म्हणाली, 'ज्या हरणाचं जीवन आपल्याला मिळावं अशी इच्छा तू करत होतीस, त्या हरणाची स्थिती किती भयंकर आहे, हे आता प्रत्यक्षच पाहिलंस ना! ज्या मोठेपणाबरोबर अनेक दुःखंही भोगावी लागतात, तो मोठेपणा देवाने आपल्याला दिला नाही याबद्दल त्याचे आभार मान.'

बोध : बाह्य रूप पाहून भुलू नये.

Publisher: Aniket Konkar News publisher name | Date: 29-01-2026 News publication date | Time: 12:43 PM News publication time | Views: 67 Number of times this news has been viewed | District: ratnagiri Related district of the news
Publisher: Aniket Konkar News publisher name | Date: 29-01-2026 News publication date | Time: 12:43 PM News publication time | Views: 67 Number of times this news has been viewed | District: ratnagiri Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words