संत भानुदास महाराजांचा अभंग
पंढरीचे सुख पाहतां अलौकिक ।
वैकुंठनायक उभा जेथें ।।१।।
देवा जें दुर्लभ भक्तांसी सुलभ ।
रुक्मिणीवल्लभ उभा विटे ।।२।।
वैष्णवांचा मेळ करिती गदारोळ ।
त्यामाजीं गोपाळ प्रेमं नाचे ।।३।।
जिकडे पाहे तिकडे होय ब्रह्मानंद ।
भानुदासा आनंद गात असे ।।४।।
- संत भानुदास महाराज
(संकलक : प्रसाद वैद्य)
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment