राजस्थानमधील शाळांमध्ये दप्तरमुक्त शनिवार

शिक्षण क्षेत्रातील सकारात्मक बदल

राजस्थानमधील शाळांमध्ये दप्तरमुक्त शनिवार मुख्य फोटो
मुख्य फोटो

राजस्थान सरकारने सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांचे ओझे कमी करण्यासाठी आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी दर शनिवारी 'नो बॅग डे' सुरू केला आहे. संदीप जोशी हे राजस्थानमधील एक वरिष्ठ अधिकारी शिक्षणतज्ज्ञ म्हणून या उपक्रमाच्या नियोजनात आणि अंमलबजावणीत सक्रिय आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी मुलांना अभ्यासाऐवजी खेळ, कौशल्यविकास आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये गुंतवले जाते. या दिवशी पाच गटांमध्ये (अंकुर, प्रवेश, दिशा, क्षितिज आणि उन्नती) विभागून योग, नैतिक शिक्षण आणि वैयक्तिक स्वच्छतेचे धडे दिले जातात. शिक्षणात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी आणखी एक उपक्रम त्यांनी सुरू केला आहे, तो म्हणजे ज्ञानकोश मॉडेल. यामध्ये वर्षभराच्या मोठ्या पाठ्यपुस्तकांच्या जागी तिमाही अभ्यासक्रमावर आधारित एकात्मिक पाठ्यपुस्तके देण्याचा प्रस्ताव आहे. शाळेच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी हा उपक्रम आहे. संदीप जोशी यांच्या मते, अभ्यासाचा अर्थ केवळ पुस्तके नव्हे. निरोगी मन, आनंदी बालपण आणि जीवनकौशल्ये हेच खरे शिक्षण आहे.


Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 14-02-2026 News publication date | Time: 10:55 AM News publication time | Views: 25 Number of times this news has been viewed | District: nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 14-02-2026 News publication date | Time: 10:55 AM News publication time | Views: 25 Number of times this news has been viewed | District: nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words