देशातील दारिद्र्य व अज्ञान घालवणे म्हणजेच ईश्वराची सेवा होय...

स्वामी विवेकानंदांचा विचार

देशातील दारिद्र्य व अज्ञान घालवणे म्हणजेच ईश्वराची सेवा होय... मुख्य फोटो
मुख्य फोटो

स्वामी विवेकानंदांनी त्यांच्या बालपणापासून जनसेवेचे महत्त्व जाणले होते. लहानपणी दारावर आलेल्या याचकाला त्यांनी आपल्या वडिलांची महाग शाल अशीच देऊन टाकली होती. कोणालाही काही दु:ख झाले, कोणावर अन्याय झाला तर त्यांना वाईट वाटत असे. त्यांनी उद्धृत केलेला हा सुविचार खरेच सार्थ आहे. ते म्हणतात, 'देशातील दारिद्र्य व अज्ञान घालवणे म्हणजेच ईश्वराची सेवा होय. कारण भुकेल्या माणसाला अन्न देणे हेच सर्वश्रेष्ठ पूजन आहे.'

अज्ञानाच्या अंधारात असलेल्या समाजाला ज्ञानाचा प्रकाश देणे हे पुण्यकर्म आहे. फक्त देवळात जाऊन पूजा करणे म्हणजे सेवा नव्हे. गरजूंच्या डोळ्यांतील अश्रू पुसणे हीच खरी भक्ती आहे. शिक्षणामुळे माणसाच्या जीवनात आत्मविश्वास व स्वाभिमान निर्माण होतो. दारिद्र्याचे मूळ कारण म्हणजे अज्ञान आणि भूक असते. माणूस पोटातल्या भुकेने आणि मनातल्या अज्ञानाने दारिद्र्य पत्करतो. ते दूर झाले तर समाज प्रगतिपथावर चालू लागतो. मानवसेवेतूनच राष्ट्रसेवा घडते.

Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 28-01-2026 News publication date | Time: 10:55 AM News publication time | Views: 22 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 28-01-2026 News publication date | Time: 10:55 AM News publication time | Views: 22 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement