देशाच्या सुपुत्रांची महानता!

बोधकथा - १६

देशाच्या सुपुत्रांची महानता! मुख्य फोटो
देशाच्या सुपुत्रांची महानता! अतिरिक्त फोटो

२००७ सालची गोष्ट आहे. कुनूरच्या डोंगररांगांमध्ये पसरलेल्या थंडगार सकाळी वातावरण विलक्षण शांत होते. लष्करी रुग्णालयाच्या प्रवेशद्वारातून राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम साधेपणाने आत शिरले. ना मोठा ताफा, ना कॅमेऱ्यांचा झगमगाट—फक्त मनात एकच विचार. फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ तेथे उपचार घेत होते. सॅम बहादूर म्हणून ओळखले जाणाऱ्या माणेकशॉ यांच्या नेतृत्वाखाली भारताने इतिहासातील एक तेजस्वी विजय पाहिला होता.

डॉ. कलाम यांनी हळूच खोलीत प्रवेश केला. पलंगावर सॅम शांतपणे पडलेले होते. शरीर थकलेले; पण चेहऱ्यावरचे तेज अजूनही तसेच होते. डॉ. कलामांनी जवळ जाऊन मृदू स्वरात विचारले, 'काही अडचण आहे का?'

सॅम म्हणाले, 'हो…एक अडचण आहे...'

क्षणातच कलाम काळजीने पुढे झुकतात. 'काय अडचण आहे?'

थोडे थांबून सॅम म्हणाले, 'माझ्या देशाचे राष्ट्रपती माझ्यासमोर उभे आहेत… आणि मी त्यांना सलामी देण्यासाठी उठू शकत नाही.'

क्षणभर खोलीत नीरव शांतता पसरते. डॉ. कलाम यांनी माणेकशॉ यांचा हात धरला. दोघांचेही डोळे पाणावले. दोन महापुरुषांची ती भेट होती...

डॉ. कलाम निघताना सॅम त्यांनी कधीही मागणी न केलेल्या एका गोष्टीचा हळूच उल्लेख करतात. फिल्ड मार्शल कधीच रिटायर होत नाही. त्यांना त्यांच्या वेतन/पेन्शनची बरीच रक्कम मिळणे बाकी होते. त्याविषयी त्यांनी सांगितले.

डॉ. कलाम यांनी ऐकून घेतले. त्यानंतर आठवड्याच्या आतच संरक्षण सचिवांनी स्वतः वेलिंग्टनमध्ये येऊन माणेकशॉ यांच्या हातात सुमारे १.३ कोटी रुपयांचा धनादेश दिला. कोणताही गाजावाजा नाही. फक्त तात्काळ कृती.

या गोष्टीचा शेवट अधिकच उत्तुंग आहे...

सॅम माणेकशॉ यांनी ती संपूर्ण रक्कम थेट लष्कर मदत निधीला दान केली...

या महानतेची मोजदाद कोणत्या परिमाणांनी करणार?

Publisher: Aniket Konkar News publisher name | Date: 26-01-2026 News publication date | Time: 01:21 PM News publication time | Views: 85 Number of times this news has been viewed | District: ratnagiri Related district of the news
Publisher: Aniket Konkar News publisher name | Date: 26-01-2026 News publication date | Time: 01:21 PM News publication time | Views: 85 Number of times this news has been viewed | District: ratnagiri Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words