संत तुकाराम महाराजांचा अभंग
समचरणदृष्टी विटेवरी साजिरी।
तेथें माझी हरी वृत्ति राहो ।।१।।
आणिक न लगे मायिक पदार्थ ।
तेथें माझें आर्त्त नको देवा ।।२।।
ब्रह्मादिक पदें दुःखाची शिरोणी ।
तेथें दुग्धित झणीं जडों देसी ।।३।।
तुका म्हणे त्याचे कळलें आम्हा वर्म ।
जे जे कर्म धर्म नाशिवंत ।।४।।
- संत तुकाराम महाराज
(संकलक : प्रसाद वैद्य)
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment