संत एकनाथ महाराजांचा अभंग
भक्तिवीण पशु कशासी वाढला ।
सटवीने केला कैसा नाही ।।१। ।
काय माय गेली होती भूतापार्शी ।
हरि नये मुखासी अरे मूढा ।।२। ।
पातकं करिता पुढें आहे पुसता ।
काय उत्तर देतां होशील तू ।।३। ।
अनेक यातना यम करवील ।
कोण सोडवील तेथें तुजला ।।४। ।
एका जनार्दनी सांगताहे तोंडे ।
आहा वांचा रडे बोलतांची ।।५। । - संत एकनाथ महाराज(संकलक : प्रसाद वैद्य, रत्नागिरी)
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment