संत तुकाराम महाराजांचा अभंग
वृत्ति भूमि राज्य द्रव्य उपार्जिती ।
जाणा त्या निश्चिती देव नाही ।।१।।
भाडेकरी वाहे पाठीवरी भार ।
अंतरीचे सार लाभ नाहीं ।।२।।
देवपुजेवरी ठेवूनियां मन ।
पाषाणा पाषाण पूजी लोभें ।।३।।
तुका म्हणे फळ चिंतिती आदर ।
लाघव हे चार शिंदळीचे ।।४।।
- संत तुकाराम महाराज
(संकलक : प्रसाद वैद्य)
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment