ज्योती परिहार

महिला आणि बालकांना स्वावलंबी बनवण्यासाठी कार्य करणारी महिला

ज्योती परिहार मुख्य फोटो
मुख्य फोटो

आपण ज्या समाजाचा एक भाग आहोत त्यातील दोन महत्त्वाचे घटक म्हणजे महिला आणि मुले. समाजाचे हे दोन घटक परिपूर्ण असतील, तर तो समाज नक्कीच संतुलित राहू शकतो. हीच महत्त्वाची गोष्ट लक्षात घेऊन महिला आणि बालके यांना स्वयंपूर्ण बनवणारी, त्यासाठी झटणारी महिला म्हणजे बिहारमधील ज्योती परिहार. 

ज्योती परिहार बिहारमधील किलकारी बिहार बालभवनच्या संचालक आहेत आणि बालविकासासाठी काम करतात. त्यांनी मुलांसाठी आधुनिक आणि अनुकूल वातावरण तयार करण्यावर भर दिला आहे. विशेषतः बिहारमधील मुलांमधील सर्जनशील क्षमता वाढवण्यासाठी त्यांचे मोठे योगदान आहे. त्यात 'चहक'सारख्या सरकारी कार्यक्रमांचाही समावेश आहे. त्यांनी मनोविज्ञान विषयामध्ये पदव्युत्तर पदवी घेतलेली असून, बाल आणि महिलांच्या हक्कांवर लेखनही करतात. गेली ३० वर्षे त्या हे काम करत आहेत. ‘हुनर’ या योजनेद्वारे त्यांनी सरकारी सहयोगाने मुलींना मानवी तस्करीतून सोडवले. त्यांना शिक्षणाशी जोडले आणि सुरक्षित भविष्याकडे नेले. त्यांनी १७ हजार महिलांना स्वावलंबी होण्यासाठी सक्षम केले. त्यांच्या या कार्याची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्येही नोंद झालेली आहे.

(संकलित)

Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 22-01-2026 News publication date | Time: 10:55 AM News publication time | Views: 1 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 22-01-2026 News publication date | Time: 10:55 AM News publication time | Views: 1 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement