संत भानुदास महाराजांचा अभंग
आशेचिया सोसें गुंतसी पामरा ।
न चुकती येरझारा चौऱ्यांशीच्या ।।१।।
मदाचिया सोसें गुंतसी पामरा ।
न चुकती येरझारा चौऱ्यांशीच्या ।।२।।
तृष्णेचिया सोसें धांवशी पामरा ।
न चुकती येरझारा चौऱ्यांशीच्या ।।३।।
कल्पनेच्या मागे धांवशी कल्पका ।
न पावसी सुखा बुडसी वांयां ।।४।।
भानुदास म्हणे सर्व हें सोडुनी ।
एक चक्रपाणी सखा करीं ।।५।।
- संत भानुदास महाराज
(संकलक : प्रसाद वैद्य)
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment