दृढ इच्छाशक्ती असलेला विद्यार्थी
जगात इच्छाशक्तीसारखे मोठे प्रेरणास्थान नाही. माणसाची इच्छा असेल तर नक्कीच तो अतिशय कठीण परिस्थितीवर मात करतो आणि आयुष्यात पुढे जातो. असेच एक उदाहरण आहे मध्य प्रदेशातील डॉ. शुभम गौर यांचे.
डॉ. शुभम गौर यांना २०१९मध्ये भयानक अपघाताला सामोरे जावे लागले. या भीषण अपघातात त्यांच्या शरीराच्या डाव्या भागाला अर्धांगवायू झाला. हा अपघात झाला, तेव्हा ते एका दंतवैद्य क्लिनिकमध्ये कामाला होते. अपघातामुळे त्यांची नोकरी गेली. शरीर निकामी झाले असल्याने त्यांचे क्लिनिकही बंद झाले; पण त्यांनी हार मानली नाही. त्यांनी पुढील चार वर्षे एमपीएससी, यूपीएससी परीक्षांची तयारी केली. २०२४मध्ये त्यांना न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेडमध्ये क्लास वन अधिकारी म्हणून निवड झाली. हा त्यांचा प्रवास अजूनही थांबलेला नाही. आता ते आयएएस अधिकारी होण्यासाठी तयारी करत आहेत. अशी इच्छाशक्ती असेल तर माणसाला काय अवघड असेल? म्हणतात ना आकांक्षांपुढती जिथे गगन ठेंगणे!
(संकलित)
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment