संत तुकाराम महाराजांचा अभंग
वाट पाहे हरि कां न ये अजुनि ।
निष्ठुर कां मनीं धरियेलें ।।१।।
काय करूं धीर होत नाहीं जीवा ।
काय आड ठेवा उभा ठेला ।।२।।
नाहीं माझा धांवा पडियेला कानीं ।
कोठें चक्रपाणी गुंतलेती ।।३।।
नाहीं कळों आलें अंतरा अंतर ।
कृपावंत फार ऐकतोंहे ।।४।।
बहुतां दिसांचें राहिलें भातुकें ।
नाहीं कवतुकें कुरवाळिलें ।।५।।
तुका म्हणें देई एक वेळां भेटी ।
शीतळ हें पोटीं होईल मग ।।६।।
- संत तुकाराम महाराज
(संकलक : प्रसाद वैद्य, रत्नागिरी)
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment