छत्रपती संभाजीनगरमधील उद्योजक वैभव कुलकर्णी यांच्या व्यवसायाला नवी ऊर्जा आणि दिशा
छत्रपती संभाजीनगर : कोणताही व्यवसाय विश्वासावर चालतो. व्यवसायाची विश्वासार्हता वाढली, की यश मिळते आणि त्या यशातून आत्मविश्वासही वाढतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे छत्रपती संभाजीनगर येथील वसुधा फूड लॅबचे संचालक वैभव कुलकर्णी. अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या अमृतपेठ या ई-कॉमर्स पोर्टलवर नोंदणी केल्यामुळे त्यांची दर्जेदार आणि विश्वासार्ह खाद्य उत्पादने अधिक व्यापक पातळीवर पोहोचली आहेत.
वसुधा फूड लॅब या नावाने वैभव कुलकर्णी यांचा खाद्यपदार्थ तयार करण्याचा व्यवसाय आहे. वसुधा फूड लॅबमध्ये खाद्यपदार्थ तयार करताना शुद्धता, स्वच्छता आणि गुणवत्ता यांना प्राधान्य दिले जाते. ताजी आणि दर्जेदार फळे व भाज्या निवडून, पूर्ण स्वच्छता राखून, कोणतीही भेसळ न करता उत्पादन केले जाते. कोणताही कृत्रिम रंग, प्रिझर्व्हेटिव्ह किंवा अतिरिक्त घटक न वापरता खाद्यपदार्थ तयार केले जातात. 'शुद्ध अन्न आणि प्रामाणिक पोषण' हेच वसुधा फूड लॅबचे ब्रीद आहे. आल्याची पावडर, बीटरूटची पावडर अशी त्यांची उत्पादने लोकप्रिय आहेत.
अमृतपेठ या अमृत संस्थेच्या ई-कॉमर्स पोर्टलची माहिती कुलकर्णी यांना मिळाली. या पोर्टलवर नोंदणी केल्याने खरोखर फायदा होईल का, अशी शंका सुरुवातीला त्यांच्या मनात होती; मात्र अमृतपेठवरील सोपी नोंदणी प्रक्रिया आणि अमृतच्या टीमकडून मिळालेल्या सहकार्यामुळे त्यांनी आपल्या उत्पादनांची नोंदणी 'अमृतपेठ'वर केली.
नोंदणी केल्यानंतर त्यांच्या उत्पादनांना चांगला प्रतिसाद मिळाला. विक्री वाढली आणि अधिक ग्राहकांपर्यंत त्यांची उत्पादने पोहोचली. मुळात विश्वासार्ह असलेल्या त्यांच्या उत्पादनांना अमृतपेठसारखे विश्वासार्ह व्यासपीठ मिळाले. त्यामुळे 'अमृतपेठवर उपलब्ध असलेले उत्पादन म्हणजे विश्वासार्ह उत्पादन,' अशी भावना ग्राहकांमध्ये निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.
या यशामुळे वैभव कुलकर्णी यांना नवा आत्मविश्वास मिळाला आहे. अमृतपेठ या पोर्टलमुळे स्थानिक उद्योजकांना मोठा आधार मिळत आहे, असेही त्यांनी नमूद केले. यापुढेही अमृत संस्थेच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्याचा आपला प्रयत्न राहील, असे त्यांनी सांगितले.
तुम्हालाही घरपोच मागवायची आहेत का ही उत्पादने? अमृतपेठच्या पुढील लिंकवर क्लिक करा. https://amrutpeth.com/shop/Vasudha-Food-Labs-1012
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in
Comments 1 Comments
Ganesh Umap
How can buy online
Write a Comment