पुस्तकाचा परिचय...
'हू मूव्ह्ड माय चीज?' (Who Moved My Cheese?) हा डॉ. स्पेन्सर जॉन्सन यांनी लिहिलेल्या जगप्रसिद्ध प्रेरणादायी पुस्तकाचा मराठी अनुवाद आहे. बदलांना कशा प्रकारे सामोरे जावे, हे या पुस्तकात एका छोट्या गोष्टीच्या माध्यमातून समजावून सांगितले आहे.
ही गोष्ट एका भुलभुलैयामध्ये राहणाऱ्या दोन उंदरांची (स्निफ आणि स्करी) आणि दोन बुटक्या माणसांची (हेम आणि हॉ) आहे. ते सर्व जण 'चीज' (जे आनंद आणि यशाचे प्रतीक आहे) शोधत असतात. एके दिवशी त्यांचे चीज संपते, तेव्हा हे चारही जण त्या परिस्थितीला कसे सामोरे जातात, यावर ही कथा आधारित आहे.या पुस्तकात चार उंदीर आहेत, जे चार मनोवृत्तींचे प्रतिनिधित्व करतात.
स्निफ (Sniff) : बदलाचा वास लवकर ओळखतो.
स्करी (Scurry) : बदल घडताच लगेच कृती करतो.
हेम (Hem) : बदलाला विरोध करतो आणि जुन्याच गोष्टींना चिकटून राहतो.
हॉ (Haw) : सुरुवातीला घाबरतो; पण नंतर बदल स्वीकारून पुढे जातो.
या पुस्तकातून आपण काय शिकायचे, तर बदल अटळ आहे. जगात कोणतीही गोष्ट कायमस्वरूपी नसते. बदल होणारच.
बदलाची भीती सोडा. बदलाला घाबरण्याऐवजी त्याचा स्वीकार केला तर नवीन संधी मिळतात. लवचीक राहा. जुन्या गोष्टी सोडून नवीन गोष्टींचा शोध घेणे प्रगतीसाठी आवश्यक आहे. लवकर कृती करा. बदलाचा अंदाज घेऊन जितक्या लवकर तुम्ही पाऊल उचलाल, तितके तुम्ही सुखी राहाल. मनुष्यप्राणी हा बदलांना घाबरतो.
आपल्या मनात अनेक गोष्टी कराव्या असे असते; पण त्या गोष्टी केल्याने आपल्या आयुष्यात जो बदल घडणार आहेत त्यांना सामोरे जायची आपली तयारी नसते. पाण्यात दगड मारला तर संथ पाण्यावर जसे तरंग उठतात, हे तसेच आहे. ज्यांना आपल्या आयुष्यात किंवा नोकरी-व्यवसायात येणाऱ्या बदलांमुळे तणाव जाणवतो, त्यांच्यासाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे. हे पुस्तक खूप छोटे असून अत्यंत सोप्या भाषेत जीवनाचे मोठे तत्त्वज्ञान सांगते. आवर्जून वाचावे असे हे पुस्तक.
पुस्तकाचे नाव - हू मूव्हड माय चीज?
मूळ लेखक - डॉ. स्पेन्सर जॉन्सन
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment