सर्वांत आधी आणि सर्वांत शेवटी आपण एक भारतीय आहोत.... - अमृत महाराष्ट्र

सर्वांत आधी आणि सर्वांत शेवटी आपण एक भारतीय आहोत....

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार...

सर्वांत आधी आणि सर्वांत शेवटी आपण एक भारतीय आहोत.... मुख्य फोटो
सर्वांत आधी आणि सर्वांत शेवटी आपण एक भारतीय आहोत.... अतिरिक्त फोटो

प्रभू श्रीरामांनी रावणाचा वध करून सोन्याच्या लंकेवर विजय प्राप्त केला, तरी तिथे गेल्यानंतर ते म्हणाले होते, की 'लंका सोन्याची असली, तरी मला ती आवडत नाही. कारण जननी आणि जन्मभूमी या स्वर्गापेक्षाही महान आहेत.' 

आपली मातृभूमी म्हणजे आपली मातृभूमी असते. आपला भारत हीच आपली खरी ओळख आहे. जगाच्या पाठीवर आपण भारतीय म्हणूनच ओळखले जातो. आधी भारतीय मग आपला धर्म, जात, पंथ, वर्ण या गोष्टी येतात. त्यामुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, की 'सर्वांत आधी आणि सर्वांत शेवटी आपण एक भारतीय आहोत.' 

म्हणूनच आपल्या प्रतिज्ञेची सुरुवात ‘भारत माझा देश आहे’ अशी आहे. आपण सारे भारतीयत्वाच्या एका समान धाग्याने बांधले गेले आहोत. आपला स्वातंत्र्यसंग्रामसुद्धा याच एका समान सूत्राने लढला गेला होता. स्वातंत्र्यसैनिक देशाच्या कोणत्याही भागातून आंदोलन करत असला, तरीही तो देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढत होता. हीच समरसता आताही आपल्या भारताच्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहे .कारण आपण एक राहिलो, भारतीय या एकाच नात्याने एकरूप झालो, तरच येत्या काळात आपले अस्तित्व टिकून राहणार आहे. जगातल्या अनेक देशांत आज अराजकतेचे वातावरण आहे. अशा काळात आपल्या एकोप्यानेच आपण सुरक्षित राहणे शक्य आहे.

Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 14-04-2026 News publication date | Time: 01:55 AM News publication time | Views: 122 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 14-04-2026 News publication date | Time: 01:55 AM News publication time | Views: 122 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement