संत एकनाथ महाराजांचा अभंग
निर्गुण सगुण श्रुतीसी वेगळे ।
तें रूप सांवळें गोकुळी वसे ।।१।।
डोळियांची धणी पाहतां न पुरे ।
तयालागीं झुरे चित्त माझें ।।२।।
वेडावलीं दरुशनें भांडती अखंड ।
वेदाचें तें तोंड स्तब्ध जाहलें ।।३।।
एका जनार्दनीं सांवळें सगुण ।
खेळतसे जाण वृंदावनीं ।।४।।
- संत एकनाथ महाराज
(संकलक : प्रसाद वैद्य, रत्नागिरी)
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment