डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा विचार
आपण आपल्या अवतीभवती अनेक यशस्वी माणसे पाहतो. ही माणसे त्यांच्या करीयरमध्ये अगदी उच्चपदावर असतात. त्यांची सामाजिक, आर्थिक प्रतिष्ठा मोठी असते. आपल्याला त्याचं यश दिसत परंतु त्यामागची त्यांची मेहनत दिसत नाही. यशाचा मार्ग हा नेहमी खडतर प्रयत्नांतून जातो. आपण कोणतीही अपेक्षा न ठेवता एखाद्या उत्तुंग धेय्याकडे जाण्यासाठी प्रयत्न करत राहिलो तर एक ना एक दिवस नक्की यश मिळते.
डॉ. कलाम यांचा हा सुविचार खरे तर त्यांच्या वैयक्तिक आयुष्याचा जणू आरसा दाखवतो. त्यांनीसुद्धा त्यांच्या संपूर्ण आयुष्यात अविरत प्रयत्न केले आणि मगच ते यशस्वी वैज्ञानिक झाले आणि नंतर राष्ट्रपतीपदाचा सन्मान प्राप्त झाला. डॉ. कलाम यांनी प्रयत्नांचे आपल्या आयुष्यातील महत्व अधोरेखित करण्यासाठी सूर्य, तो देणारा प्रकाश आणि त्यासाठी सूर्याला सहन करावे लागणारे जळणे याचे उदाहरण दिले आहे. ते म्हणतात, तुम्हाला सूर्यासारखे तेजस्वी व्हायचे असेल, तर आधी त्याच्यासारखे सतत जळण्याचे धैर्य अंगी बाणवावे लागते. सूर्य कुठल्याही कौतुकाची अपेक्षा न करता दररोज स्वतःला झोकून देतो. अंधार दूर करण्यासाठी स्वतःची प्रकाशमय ऊर्जा खर्च करतो.
यशाचे तेज सहज मिळत नाही. त्यामागे त्याग, कष्ट आणि वेदनांची आग असते. स्वप्न पूर्ण करताना अनेकदा स्वतःलाच झिजवावे लागते; पण जो हा प्रवास स्वीकारतो, तोच अखेरीne इतरांच्या जीवनात उजेड पसरवतो. जळल्याशिवाय चमकण्याचा अधिकार कुणालाच मिळत नाही.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment