इच्छा तिथे मार्ग

हार्दिक कौशल यांची प्रेरक यशोगाथा

इच्छा तिथे मार्ग  मुख्य फोटो
मुख्य फोटो

जेव्हा संघर्ष हिमतीत बदलतो, तेव्हा मनुष्य कोणतेही स्वप्न साकार करू शकतो. ही निव्वळ एखादी शाब्दिक करामत नाही, तर खरेच जेव्हा एखादा माणूस पक्का निश्चय करतो, तेव्हा त्याला यशस्वी होण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. अशीच एक संघर्षकथा आहे पंजाबमधील हार्दिक कौशल यांची. 

पंजाबातील बर्नाला येथील हार्दिक कौशल यांनी अलीकडेच राजस्थान सिव्हिल जज परीक्षा उत्तीर्ण केली आहे. वयाच्या सातव्या वर्षी हायटेन्शन तारेच्या संपर्कात आल्याने त्यांचे दोन्ही हात कापावे लागले होते. कृत्रिम अवयवांचा उपयोग करूनही काही दैनंदिन कामांत त्यांना आपल्या पालकांची आणि इतरांची मदत घ्यावी लागत होती. पुढे त्यांना त्यांच्या कोपराच्या साह्याने लिहिणे, इतर कामे करणे हे जमू लागले. आपल्या प्रयत्नांनी त्यांनी मजल दरमजल करत राजस्थान सिव्हिल जज परीक्षा उतीर्ण केली आहे. हार्दिक यांची ही संघर्षगाथा आपल्याला हेच दाखवते, की इच्छा असेल तर मार्ग दिसतोच... गरज असते ती तुमच्या आंतरिक प्रेरणेची आणि चिकाटीची.

(संकलित)

Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 13-01-2026 News publication date | Time: 10:35 AM News publication time | Views: 20 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 13-01-2026 News publication date | Time: 10:35 AM News publication time | Views: 20 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement