तुमच्या मनाची सुप्त शक्ती : द पॉवर ऑफ युवर सबकॉन्शस माइंड

पुस्तकाचा परिचय...

तुमच्या मनाची सुप्त शक्ती : द पॉवर ऑफ युवर सबकॉन्शस माइंड  मुख्य फोटो
मुख्य फोटो

सुखी, परिपूर्ण व समृद्ध जीवन जगण्याची आस सर्वांनाच असते; पण त्यासाठी काय करावे, हे अनेकांना माहीत नसते. जे समोर येते ते आयुष्य जगणे हे हिताचे असे समजले जाते; मात्र मनातील अचेतन शक्तीचा वापर केल्यास अनेक गोष्टी सहजसाध्य होऊ शकतात, असे डॉ. जोसेफ मर्फी यांनी 'द पॉवर ऑफ युवर सबकॉन्शस माइंड' या पुस्तकात लिहिले आहे. अचेतन मनाची शक्ती जागृत करण्याचे शास्त्रीय मार्ग त्यांनी या पुस्तकातून सुचवले आहेत. प्रार्थनेतील शक्ती, तिचे महत्त्व त्यांनी विशद केले आहे. आपल्या आंतरिक शक्तीचा खजिना, त्यामुळे घडू शकणारे चमत्कार, मनाचे कार्य, प्राचीन व आधुनिक काळातील उपचार, अचेतन मन आणि निद्रा, वैवाहिक समस्या, सुसंवादी मानवी संबंध, मानसिक अडथळे दूर करण्यासाठी होणारा उपयोग याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले आहे.

आपल्या अंतर्मनाची क्षमता व ताकद खरोखरीच अफाट असते. आपण शांततेत, पूर्ण प्रेमाने आणि अगदी हळुवारपणे आपल्या अबोध-सुप्त मनाशी संवाद साधला आणि त्याला योग्य सकारात्मक व संभाव्य सूचना दिल्या, तर सारे काही आपल्या मनासारखे घडू शकते. मुख्य म्हणजे, आपण आपल्या भयावर वा न्यूनगंडावर मात करू शकतो. आपले अबोध-अंतर्मन हे आपल्या संवादानुसार-सूचनेनुसार मोठ्या आज्ञाधारक पद्धतीने विचार-वर्तन करत असते. आपले अंतर्मन आणि आपले बाह्य मन यात समतोल, सहयोग आणि संवाद सतत राहू द्या, असे त्या पुस्तकात लिहिले आहे.

पुस्तकाचे नाव : द पॉवर ऑफ युवर सबकॉन्शस माइंड

मूळ लेखक : डॉ. जोसेफ मर्फी

मराठी अनुवाद : तीन ते चार लेखकांनी याचा मराठी अनुवाद केलेला आहे.

Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 13-01-2026 News publication date | Time: 10:31 AM News publication time | Views: 8 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 13-01-2026 News publication date | Time: 10:31 AM News publication time | Views: 8 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement