संत एकनाथ महाराजांचा अभंग
मन करूनिया सावध ।
वाचे स्मरे तूं गोविंद ।।१।।
तेणें साधे सर्व काज ।
सकळ साधनांचे निज ।।२।।
मन धरी एकमुष्टी ।
वाचे जपे नाम गोष्टी ।।३।।
मन धांवे भलतीकडे ।
साधन वायां जाय कोडें ।।४।।
मन आवरुनी साधन ।
तेणें पावसी निजखूण ।।५।।
खूण संतांवांचुनि ।
एका जनार्दनी ध्यानीं ।।६।।
- संत एकनाथ महाराज
(संकलक : प्रसाद वैद्य, रत्नागिरी)
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment