संत निळोबा महाराज यांचा अभंग
येथें तुजला बोलाविलें कोणीं ।
प्रार्थिल्यावांचुनि आलासी कां ।।१।।
प्रल्हादा कैवारी दैत्यांशीं दंडाया ।
स्तंभीं देवराया प्रगटोनी ।।२।।
तैशापरी मजला नाहीं बा संकट ।
तरी कां फुकट श्रम केला ।।३।।
निळा म्हणे आम्ही नोळखो देवा ।
तुकयाचा धांवा करितसो ।।४।।
- संत निळोबा महाराज
(संकलक : प्रसाद वैद्य, रत्नागिरी)
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment