मुसाफिर

अच्युत गोडबोलेंच्या विविध क्षेत्रांतील मुशाफिरीचे प्रेरणादायी कथन करणारे पुस्तक

मुसाफिर मुख्य फोटो
मुख्य फोटो

आपले आयुष्य हे अनेक धाग्यांनी विणलेले असते... सुखाच्या, दु:खाच्या, मायेच्या, विरहाच्या, आकस्मिक अडचणींच्या... आपल्या आयुष्यातल्या या बहुरंगी धाग्यांच्या वस्त्राला आपण जीवन म्हणतो. आपल्या या सगळ्या अनुभवांचे सार शब्दांत मांडून ते समोरच्यासाठी दिशादर्शक ठरले तर किती उत्तम होईल ना! असे स्वानुभव, आयुष्याकडे बघण्याची सकारात्मक दृष्टी आणि मागे वळून पाहताना पुढचा विचार करणारे प्रेरणादायी पुस्तक म्हणजे अच्युत गोडबोले लिखित ‘मुसाफिर.’

अच्युत गोडबोले यांचा जन्म सोलापूर येथे झाला. एकत्रित कुटुंबात वाढल्यामुळे त्यांचे बालपण खूप रंजक होते. त्यांच्या सर्व भावंडांनी आपापल्या क्षेत्रात चांगली प्रतिष्ठा मिळवली होती. त्यांच्या बालपणीच्या अनेक आठवणी त्यांनी या पुस्तकात दिल्या आहेत. परीक्षा संपल्यावर केलेल्या गमतीजमती, सोलापूरमधील प्रसिद्ध ठिकाणे आणि अशा अनेक गोष्टी या पुस्तकात दिल्या आहेत. पुढे शालेय जीवनात त्यांचे शिक्षक, आवडते विषय, हिंदीसारख्या विषयात येणाऱ्या अडचणी, पुढे बोर्डात मिळवलेले यश हा सगळा प्रवास त्यांनी उत्तमरीत्या शब्दबद्ध केला आहे. 

पुढे आयआयटी या प्रसिद्ध संस्थेतील प्रवेश, तेथील हॉस्टेलचे आयुष्य, विविध पुस्तकांवरील चर्चा, साहित्य-संगीत या विषयांवर रंगलेल्या चर्चा अशा अनेक घटनांची रंजक कथा सांगितली आहे. पुस्तके वाचण्याचा आणि त्यावर मनन करण्याचा छंद याच काळात जडला असे त्यांनी नमूद केले आहे. नोकरीच्या काळात तेव्हाच्या तंत्रज्ञानानाचे बदलते स्वरूप, अनेक जगप्रसिद्ध कंपन्यांमध्ये केलेले काम, अनुभव, कामाच्या वेळा आणि झपाटून जाऊन काम करणे हे सगळे विस्तृत दिले आहे. आयुष्य असे धावत असताना त्यांच्या मुलाच्या आजारपणाने आयुष्यात आलेले वादळ, त्यांचे आणि त्यांच्या पत्नीचे कोलमडून जाणे व पुन्हा उभे राहणे, डॉक्टर, दवाखाने करताना मुलाच्या आजारपणाविषयीची पुस्तके वाचणे... त्यांचा हा सारा प्रवास वाचला की वाचकाला नकळत लढण्याची ताकद मिळते. आयुष्यातील प्रत्येक चढउताराला धैर्याने तोंड देणे, हे सगळे करता असताना ज्ञानार्जन करत राहणे, हे सारे वाचताना वाचक गुंतत जातो. आवर्जून वाचावे आणि पुन्हा पुन्हा वाचावे असे पुस्तक म्हणजे ‘मुसाफिर.’

पुस्तकाचे नाव : मुसाफिर 

लेखक : अच्युत गोडबोले

Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 09-02-2026 News publication date | Time: 06:54 AM News publication time | Views: 61 Number of times this news has been viewed | District: nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 09-02-2026 News publication date | Time: 06:54 AM News publication time | Views: 61 Number of times this news has been viewed | District: nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words