करुणा, क्षमाशीलता आणि धार्मिक सहिष्णुतेचे जागतिक प्रतीक
काही माणसे आपल्या हक्कासाठी आणि न्यायासाठी जन्मभर लढा देतात. त्यांना यासाठी आपला देशही सोडावा लागतो. असेच नाव म्हणजे दलाई लामा. आपल्या मातृभूमीसाठी, तेथील लोकांच्या हक्कासाठी आजन्म लढणारे हे व्यक्तिमत्त्व.
सहा जुलै १९३५ रोजी तिबेटमधील ताकत्सर या छोट्या गावात एका शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांचे बालपणीचे नाव ल्हामो धोंडुप असे होते. अवघ्या दोन वर्षांचे असताना त्यांना १३व्या दलाई लामांचा पुनर्जन्म म्हणून मान्यता मिळाली. १७ नोव्हेंबर १९५० रोजी ते औपचारिकपणे चौदावे दलाई लामा बनले. १९५०मध्ये चीनने तिबेटवर आक्रमण केले. चीनच्या वाढत्या अत्याचारांमुळे दलाई लामांना १९५९मध्ये तिबेट सोडून भारतात आश्रय घ्यावा लागला. ते सध्या भारताच्या हिमाचल प्रदेश राज्यातील धर्मशाला येथे वास्तव्यास आहेत. येथूनच ते तिबेटी निर्वासितांच्या सरकारचे नेतृत्व करतात.
अहिंसा आणि शांततेच्या माध्यमातून तिबेटच्या मुक्तीसाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांना १९८९मध्ये नोबेल शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दलाई लामा हे करुणा, क्षमाशीलता आणि धार्मिक सहिष्णुतेचे जागतिक प्रतीक मानले जातात.
(संकलित)
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment