संत भानुदास महाराजांचा अभंग
चंचळ हें मन नावरें माझ्यानें ।
कामाच्या व्यसनें पीडितसे ।।१।।
अविवेकाचें बळ झालें असे फार ।
धांवती षड्विकार सैरावैरां ।।२।।
विवेकाची शक्ती होऊनिया क्षीण ।
सत्कर्मासी हीन बुद्धी झाली ।।३।।
चित्ताचा चालक अगा सूत्रधारी ।
भानुदासा हरी कृपा करी ।।४।।
- संत भानुदास महाराज
(संकलक : प्रसाद वैद्य, रत्नागिरी)
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment