स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विचार
आपला स्वातंत्र्यसंग्राम तसा खूप जुना आहे. दीडशे वर्षे तर फक्त इंग्रजांनी आपल्यावर राज्य केले; मात्र त्याआधीपासून आपल्यावर परकीय आक्रमणे होतच होती. या आक्रमणांच्या विरुद्ध त्या वेळच्या राज्यकर्त्यांनी, त्यांच्या सैनिकांनी बलिदान दिले, आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा केली. तरी आपण पारतंत्र्यात गेलो. मग ही सगळी बलिदाने वाया गेली का? तर नाही. ज्याप्रमाणे थेंबाथेबांनी सागर बनतो, त्याप्रमाणे या सर्वांच्या बलिदानाचे फळ आपण बघत आहोत. भारताचे पूर्ण स्वातंत्र्य या उदात्त हेतूने त्या सर्वांनी बलिदान दिले. त्यात स्त्री-पुरुष होते, सर्व जातीपातींचे लोक होते, ग्रामीण-आदिवासी, अशिक्षित-उच्चशिक्षित होते. या सगळ्यांचे ध्येय एकच होते, ते म्हणजे भारताचे स्वातंत्र्य. त्यासाठी कोणी शस्त्राने, तर कोणी विचाराने लढले. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हा सर्व संग्राम अनुभवला होता, लढला होता. म्हणूनच त्यांचा हा विचार त्या अनुभवातून आलेला आहे. एखाद्या उदात्त हेतूसाठी केलेले श्रम वाया जात नाहीत. कधी ना कधी ते कामी येतात. फक्त आपला आपल्या श्रमांवर विश्वास हवा.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment