संत तुकाराम महाराजांचा अभंग
आम्हा घरीं धन शब्दांचींच रत्नें ।
शब्दांचींच शस्त्रे यत्न करूं ।।१।।
शब्दचि आमुच्या जीवाचें जीवन ।
शब्द वाटूं धन जन लोकां ।।२।।
तुका म्हणे पाहा शब्दचि हा देव ।
शब्देंचि गौरव पूजा करूं ।।३।।
- संत तुकाराम महाराज
(संकलक : प्रसाद वैद्य, रत्नागिरी)
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment