संत ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग
निर्जिवां दगडांची काय करिसिल सेवा ।
तो तुज निर्देवा देईल काय ।।१।।
कवणे गुणें भुली पडली गव्हारा ।
तीर्थाच्या माहेरा नोळखिसी ।।२।।
अष्टोत्तरशें तीर्थे जयाच्या चरणीं ।
तो तुझ्या हृदयी आत्मारामु ।।३।।
देह देवळीं असतां जासी आना तीर्था ।
मुकलासि आतां ज्ञानदेव म्हणें ।।४।।
- संत ज्ञानेश्वर महाराज
(संकलक : प्रसाद वैद्य, रत्नागिरी)
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment