संत जनार्दन महाराजांचा अभंग
नको गुंतू लटिक्या प्रपंचासी बापा ।
मार्ग आहे सोपा पंढरीचा ।।१।।
नलगे पुसावें आटाआटी कांहीं ।
आणिके प्रवाहीं गुंतूं नको ।।२।।
भांबावल्यापरी जन झाले मूढ ।
विसरले दृढ विठोबासी ।।३।।
म्हणे जनार्दन एकनाथा निकें ।
साधी तूं कौतुकें हेंचि वर्म ।।४।।
- संत जनार्दन महाराज
(संकलक : प्रसाद वैद्य, रत्नागिरी)
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment