संत भानुदास महाराजांचा अभंग
जन्मोजन्मीं आम्हीं बहु पुण्य केलें ।
म्हणोनि विठ्ठलें कृपा केली ।।१।।
जन्मोनी संसारी जाहलों त्याचा दास ।
माझा तो विश्वास पांडुरंगीं ।।२।।
आणिका दैवता नेघे माझें चित्त ।
गोड गातां गीत विठोबाचें ।।३।।
भ्रमर मकरंदा मधासी ती माशी ।
तैसें या देवासी मन माझें ||४||
भानुदास म्हणे मज पंढरीसी न्या रे ।
सुखें मिरवा रे विठोबासी ।।५।।
- संत भानुदास महाराज
(संकलक : प्रसाद वैद्य, रत्नागिरी)
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment