संत रामदासस्वामींचा अभंग
आरंभीं वंदीन विघ्नविनायक ।
मुख्य देव येक कळावया ।।१।।
कळावया कांहिं आपुलें स्वहीत ।
सत्क्रिया विहित वेदाधारें ।।२।।
वेदाधारें क्रिया ज्ञान प्रचितिचें ।
तरीच मनाचें समाधान ।।३।।
समाधान होतें श्रवणमननें ।
सगुणभजनें अनुतापें ।।४।।
अनुतापें त्याग तोची येक योग ।
देवाचा संयोग दास म्हणे ।।५।।
- संत रामदासस्वामी
(संकलक : प्रसाद वैद्य, रत्नागिरी)
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment