अटलजी - कविहृदयाच्या राष्ट्रनेत्याची चरितकहाणी

देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा २५ डिसेंबर हा जन्मदिन. त्या निमित्ताने त्यांच्याविषयीच्या एका पुस्तकाचा हा परिचय...

अटलजी - कविहृदयाच्या राष्ट्रनेत्याची चरितकहाणी मुख्य फोटो
मुख्य फोटो

अटलबिहारी वाजपेयी यांच्याविषयी सारंग दर्शने यांनी लिहिलेले 'अटलजी - कविहृदयाच्या राष्ट्रनेत्याची चरितकहाणी' हे पुस्तक आवर्जून वाचावे असे आहे. वाजपेयी यांचा जन्म (२५ डिसेंबर १९२४) एका सर्वसाधारण मध्यमवर्गीय आणि संस्कारी कुटुंबात झाला. बालपणी त्यांच्या आईचे-वडिलांचे त्यांच्यावर झालेले संस्कार, भावाने प्रत्येक क्षणी दिलेला आधार आणि प्रोत्साहन या बाबी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या विकासात अत्यंत महत्त्वाच्या होत्या. लहान वयात त्यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी झालेला परिचय, पुढे संघाच्या शाखेत जाणे, त्यातून सरसंघचालक डॉ. हेडगेवार यांच्या प्रेरणेतून झालेला प्रवास या साऱ्याचे रोमांचक वर्णन या पुस्तकात केलेले आहे. पुढे महाविद्यालयीन शिक्षण, त्या काळातील विद्यार्थी आंदोलने, स्वातंत्र्यप्राप्तीसाठी केलेले प्रयत्न या सगळ्याची विस्तृत माहितीही पुस्तकात आहे. राजकीय आदर्श श्यामाप्रसाद मुखर्जी, दीनदयाळ शर्मा यांच्याशी अटलबिहारींचा झालेला परिचय, त्यातून त्यांचा सक्रिय राजकारणात झालेला प्रवेश, लोकसभेवर निवडून येणे, त्यानंतर १९७५च्या आणीबाणीच्या काळातील त्यांचा आणि जनसंघातील इतर नेत्यांचा संघर्ष, धरपकड, दडपशाही याची वास्तवदर्शी माहिती या पुस्तकात आपण वाचू शकतो.
युनायटेड नेशन्समधील भाषण, पुढे पंतप्रधानपदी आल्यावर त्यांच्यापुढील आव्हाने या साऱ्या बाबी अटलजींच्या मोठेपणाची साक्षच देतात. या कविहृदयाच्या नेत्याची नेता, माणूस, साहित्यिक म्हणून असलेली भव्यता या पुस्तकातून कळते. नक्की वाचावे आणि संग्रही ठेवावे असेच हे पुस्तक आहे.

हे पुस्तक म्हणजे कहाणी आहे कविहृदयाच्या राष्ट्रनेत्याची... कसलेल्या संसदपटूची आणि लोकशाहीसाठी झुंजणाऱ्या लढवय्याची... समर्थ भारताचे स्वप्न पाहणाऱ्या राजनीतिज्ञाची... सत्ता सेवेसाठी असते, हे जाणणाऱ्या दूरदर्शी नेत्याची... हिंदुत्वाचा हुंकार आणि विश्वबंधुत्व यांत भेद न करणाऱ्या उदारहृदयी राष्ट्रवाद्याची... कहाणी संघर्षाची आणि साफल्याची... कहाणी अटलजींची आणि भारताच्या विशाल राजकीय पटाची.

पुस्तकाचे नाव - अटलजी-कविहृदयाच्या राष्ट्रनेत्याची चरितकहाणी
लेखक - सारंग दर्शने

Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 24-12-2025 News publication date | Time: 07:40 PM News publication time | Views: 59 Number of times this news has been viewed | District: nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 24-12-2025 News publication date | Time: 07:40 PM News publication time | Views: 59 Number of times this news has been viewed | District: nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words