संत एकनाथ महाराजांचा अभंग
भिल्लणी बाळा वनीं वेंचितां फळा ।
देखिला रामरावो ठक पाडिलें डोळां ।।१।।
गोडणी सोहंमार्गी गीती गाती रामा ।
आनंदें नाचती दृष्टी देखोनी रामा ।।२।।
देखोनी रामरावो कैसा झाला भावो ।
सेवितां कंदमुळे आम्हां दिसतो देवो ।।३।।
सफळिता तरुवरीं साचें राम आभासे ।
पहा जनीं वनीं अवघा रामचि दिसे ।।४।।
चारा हरवेठीं बोरा भरूनियां पाटी ।
फळामाजीं फळ राम सफळीत दृष्टी ।।५।।
आसनीं शयनीं आम्हां आणीक बोधु ।
एका जनार्दनीं गोड लाविला वेधू ।।६।।
- संत एकनाथ महाराज
(संकलक : प्रसाद वैद्य, रत्नागिरी)
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment