संत बहिणाबाईंचा अभंग
वत्साचिये माय कपिला सांगातें । धांवे एकचित्तें आम्हांपुढे ।।१।। मायबाप बंधु भ्रतारासहित । इंद्रायणी जेथ तेथें आलों ।।१।। करोनीया स्नान पांडुरंग भेटी । आनंदली सृष्टी अंतरंगें ।।३।। तुकोबा आरती करीत होते तेथ । नमस्कारें स्वस्थ चित्त केलें ।।४।। स्वप्नीं जें देखिलें तेंच ध्यान तेथें । देखिलें नेमस्त पूर्ण दृष्टी ।।५।। बहिणा म्हणे तेथ भ्रतारें साष्टांग । केला अंतरंग भावयुक्त ।।६।।
- संत बहिणाबाई (संकलक : प्रसाद वैद्य)
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment