बाबासाहेब पुरंदरेलिखित ग्रंथाचा थोडक्यात परिचय...
छत्रपती शिवाजी महाराज हे अत्यंत उत्तुंग असे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व. त्यांचे बालपण, स्वराज्यस्थापना, त्यासाठी अहोरात्र केलेले कष्ट यांच्या कथा ऐकताना रोमांच उभे राहतात. त्यांचे हे समग्र चरित्र वाचणे म्हणजे एक प्रेरणादायी अनुभव आहे. बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहिलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचे विस्तृत चरित्र म्हणजे वैचारिक भरणपोषण करणारा दस्तऐवज.
पुरंदरे यांनी लिहिलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचे विस्तृत चरित्र पूर्वार्ध आणि उत्तरार्ध अशा दोन खंडांत आहे. शिवरायांचे बालपण, स्वराज्याची स्थापना, युद्धनीती आणि प्रशासन सखोलपणे या पुस्तकातून मांडले आहे. ऐतिहासिक दस्तऐवजांवर आधारित असलेल्या या चरित्रातून वाचकांना शिवकालीन इतिहासाचा थरार अनुभवायला मिळतो. ओघवते, प्रभावी आणि अभ्यासपूर्ण असे हे लेखन आहे. ऐतिहासिक कागदपत्रे, समकालीन दस्तऐवज आणि लोककथा यांच्या आधारे या पुस्तकाचे लेखन केलेले आहे. शिवरायांचे बालपण, जिजाऊंचे संस्कार आणि बालमित्रांसोबतचे खेळ याचे उत्तम शब्दांकन या पुस्तकात आहे. पुढे स्वराज्याची संकल्पना आणि तोरणा किल्ल्यापासून झालेली स्वराज्यस्थापनेची सुरुवात, अफजलखान वध, शाहिस्तेखानाची फजिती, पन्हाळगडचा वेढा यांसारख्या थरारक मोहिमांचे वर्णनही यात आहे. शिवरायांचे लष्करी कौशल्य, गडकिल्ल्यांचे व्यवस्थापन आणि अष्टप्रधान मंडळ अशा सगळ्या बाबींचा सांगोपांग ऊहापोह यात करण्यात आलेला आहे. 'राजा शिवछत्रपती' हा एक प्रेरणादायी ग्रंथ असून, त्याद्वारे शिवचरित्र घराघरात पोहोचले आहे.
ग्रंथाचे नाव - राजा शिवछत्रपती (पूर्वार्ध आणि उत्तरार्ध)
लेखक - बाबासाहेब पुरंदरे
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment