संत गोरा कुंभार यांचा अभंग
निर्गुणाचा संग धरिला जो आवडी ।
तेणें केलें देशधडी आपणासी ।।१।।
अनेकत्व नेलें अनेकत्व नेलें ।
एकलें सांडिलें निरंजनीं ।।२।।
एकत्व पाहतां अवधेंचि लटिकें ।
जें पाहें तितुकें रूप तुझें ।।३।।
म्हणे गोरा कुंभार ऐका नामदेव ।
तुह्मा आह्मा नांव कैंचे कोण ।।४।।
- संत गोरा कुंभार
(संकलक : प्रसाद वैद्य, रत्नागिरी)
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment