अकोल्यातील अमृतपेठ थेट बाजारपेठ उपक्रमाद्वारे दिव्यांग उद्योजकांनाही मिळाले व्यासपीठ - अमृत महाराष्ट्र

अकोल्यातील अमृतपेठ थेट बाजारपेठ उपक्रमाद्वारे दिव्यांग उद्योजकांनाही मिळाले व्यासपीठ

दिव्यांग सोशल फाउंडेशनच्या स्टॉलला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद

अकोल्यातील अमृतपेठ थेट बाजारपेठ उपक्रमाद्वारे दिव्यांग उद्योजकांनाही मिळाले व्यासपीठ मुख्य फोटो
अकोल्यातील अमृतपेठ थेट बाजारपेठ उपक्रमाद्वारे दिव्यांग उद्योजकांनाही मिळाले व्यासपीठ अतिरिक्त फोटो

अकोला : 'अमृतपेठ थेट बाजारपेठ हे ग्राहकांसाठी आणि छोट्या उद्योजकांसाठी अत्यंत उपयुक्त असे व्यासपीठ आहे. अमृत संस्थेच्या अमृतपेठ या उपक्रमातून दिव्यांगांनाही आपली कला आणि उत्पादने सादर करण्याची संधी मिळाली. ग्राहकांनी दिव्यांग सोशल फाउंडेशनच्या स्टॉलला भेट देऊन उत्पादनांची खरेदी केली. त्यामुळे दिव्यांग बांधवांना आर्थिक मदत झाली,' असे कौतुकोद्गार दिव्यांग सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विशाल कोरडे यांनी काढले. अकोल्यात झालेल्या अमृतपेठ थेट बाजारपेठ प्रदर्शनावेळी ते बोलत होते. 

अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेने आयोजित केलेल्या दोन दिवसांच्या या बाजारपेठेत विविध लघुउद्योजकांसोबतच दिव्यांग सोशल फाउंडेशन या आंतरराष्ट्रीय संस्थेनेही सहभाग घेतला होता. दिव्यांग बांधवांनी तयार केलेली पूजासामग्री व विविध कलात्मक उत्पादने त्या स्टॉलवर प्रदर्शित करण्यात आली होती. हा स्टॉल प्रदर्शनाचे विशेष आकर्षण ठरला आणि त्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

दिव्यांग सोशल फाउंडेशन ही संस्था दिव्यांगांचे शिक्षण, रोजगार आणि आरोग्य या क्षेत्रात महत्त्वपूर्ण कार्य करत आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विशाल कोरडे यांनी अमृत संस्थेच्या सर्व कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले. अशा प्रकारच्या प्रदर्शनांचे नियमित आयोजन व्हावे, अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली. ते म्हणाले, 'अमृत संस्थेसह काम करताना आम्हाला मनापासून आनंद झाला. दोन दिवसांत मोठ्या प्रमाणावर ग्राहकांनी आमच्या स्टॉलला भेट दिली आणि आमची उत्पादने खरेदी केली. यामुळे दिव्यांग बांधवांना आर्थिक मदत झाली.'

एकूणच, अमृतपेठ थेट बाजारपेठ या उपक्रमामुळे अन्य लघुउद्योजकांबरोबरच दिव्यांग उद्योजकांनाही एक सक्षम व्यासपीठ मिळाले असून, त्यांच्या आत्मविश्वासात वाढ झाली आहे. त्यामुळे हा उपक्रम समाजातील सर्व घटकांना समान संधी देणारा ठरला आहे.

दोन दिवसांच्या या अमृतपेठ थेट बाजारपेठ उपक्रमातून सुमारे दीड लाख रुपयांच्या मालाची विक्री झाली. त्याविषयी वाचा पुढील लिंकवर... https://amrutmaharashtra.org/news.php?id=1368

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/


Publisher: Dhananjay Kulkarni News publisher name | Date: 07-04-2026 News publication date | Time: 10:22 AM News publication time | Views: 911 Number of times this news has been viewed | District: akola Related district of the news
Publisher: Dhananjay Kulkarni News publisher name | Date: 07-04-2026 News publication date | Time: 10:22 AM News publication time | Views: 911 Number of times this news has been viewed | District: akola Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement