*अमृत मेळावा उत्साहात संपन्न**

 

**उद्योजकतेसाठी तरुणांना प्रोत्साहन – योजनांची सविस्तर माहिती**

 

लातूर : दि.२३/०९/२०२५ रोजी अमृततर्फे आयोजित मेळावा उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी **सुधीर धुतकारे** होते. प्रमुख उपस्थितीत **अमृत राज्य समन्वयक मा. दीपक जोशी**, **MCED चे प्रकल्प अधिकारी मा. दीपक गायकवाड**, तसेच **जिल्हा अग्रणीय बँकेचे अधिकारी मा. राहुल आठवले*गणेश कुलकर्णी* हे मान्यवर उपस्थित होते.

 

मेळाव्यात श्री. **जोशी यांनी अमृतमार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांची सविस्तर माहिती** दिली. तर श्री. **गायकवाड यांनी उद्योजकता विकास प्रशिक्षणाचे महत्व अधोरेखित करत तरुणांना उद्योजकतेकडे वळण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन** केले.

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन **अमृत जिल्हा व्यवस्थापक श्री. शुभम मुळजकर** यांनी केले.

मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी **अमृत उप व्यवस्थापक श्री. विनोद अपसिंगेकर** यांचे योगदान राहिले.