गेल्या काही दिवसात महाराष्ट्रातील काही भागात ‘न भूतो..’ म्हणता येईल असा प्रचंड पाऊस पडला. दरवेळी कोकण मध्य महाराष्ट्र आदी भागात पुरस्थिती निर्माण करणाऱ्या पावसाने यावेळी मराठवाडा, सोलापूर अहिल्यानगर ई भागावर वक्रदृष्टी केली, कायम दुष्काळी म्हणवले गेलेले अनेक भूभाग पाण्याखाली गेले. अनपेक्षित आसमानी आपत्तीने स्थानिक नगरिकांची शब्दश: फरफट झाली. नुसती शेतीच नाही, तर शेतकऱ्यांची स्वप्न, आकांक्षा वाहून गेल्या. लाखों रुपयांची जनावरे पुरात वाहून जातानाची दृश्य हृदयदावक होती. उभा महाराष्ट्र गहिवरला…
त्यानंतर सुरू झालेले राजकीय आरोप-प्रत्यारोप आणखी त्रासदायक होते, मदत करायची राहिली बाजूला पण त्या आपत्तीतून राजकीय फायदा कसा उचलता येईल, ब्रेकिंग न्यूज कशा तयार होतील, याकडे जास्त लक्ष दिसून आले, अर्थात याला अनेक अपवादही होतेच. अनेक राजकारणी, सामाजिक संस्था आपपल्या परीने मार्ग काढत होत्या. या सर्वात ठळक उठून दिसले ते महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था असलेल्या ‘अमृत’ संस्थेने केलेले काम!!
अमृत संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय जोशी यांनी अमृतशी संबंधित असणाऱ्या प्रत्येकाला आवाहन केले आणि त्यानंतर सुरू झाला तो ‘अमृत मदत यज्ञ’!! संस्थेसाठी काम करणाऱ्या लोकानी आपल्या अल्प मनधनातून पैसे जमा केले, अमृत मुख्यालय स्टाफ, विजय जोशी साहेब यांनी स्वत: खिशात हात घालून ‘charity begins at home’ चा प्रत्यय दिला. या सर्वांवर कडी म्हणजे ज्या मराठवाड्याला पुराने फटका दिला होता तिथले अमृतचे कर्मचारी आपली दु:खे, नुकसान विसरून सर्वात आधी मदतीला धावले. ही मदत केवळ पैशांचीच नव्हती, लोकांना धीर देणे, नुकसानग्रस्त भागात वैद्यकीय सुविधा तसेच जीवनावश्यक वस्तू पुरविणे, लोकांचा एकमेकांशी संपर्क करून देणे, लोकाना सुरक्षित स्थळी हलविणे तसेच आजारी आणि वृद्ध लोक, लहान मुले, अपंग, गर्भवती महिलांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी नियोजन केले गेले.
अमृत खूप आर्थिक मदत केली का? तर याच उत्तर ‘नाही’ असेल पण जी मदत केली ती स्वयंस्फूर्तीने आणि तत्परतेने केली, आत्यंतिक गरजवंतांना, योग्य वेळी केली. त्याची कोणतीही प्रसिद्धी मिळावी म्हणून प्रयत्न केले नाहीत. जेव्हा आभाळ फाटतं तेव्हा त्याला ठिगळ लावायला असे हजारो हात लागतात. ‘अमृत’ सारखे हात, ‘हा देश माझा आहे, त्यामुळे जबाबदारीही माझी आहे’ म्हणत पुढे येतात तेव्हा जी सकारात्मकता निर्माण होते, तिचीच आज देशाला गरज आहे. ‘अमृत’हे नाव सार्थ करणाऱ्या संस्थेचं कौतुक त्यासाठी केलचं पाहिज
अमित सामंत, रत्नागिरी.