श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचे डुबेरे येथील जन्मस्थळ
श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचे जन्मस्थळ डुबेरे (ता. सिन्नर, जि. नाशिक) येथे आहे. त्या ठिकाणी १६ डिसेंबर २०२५ रोजी भेट दिली. चंद्रशेखर बर्वे हे श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचे वंशज आहेत. श्री. बर्वे यांनी वंशावळीची संपूर्ण माहिती दिली. त्यांना अमृत संस्थेच्या योजनांविषयी माहिती दिली. तसेच सिन्नर येथील अमृत संवाद बैठकीचे आमंत्रण दिले..
श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या जन्मस्थळ वास्तूला ३२८ वर्षे पूर्ण झाली. आजही ही वास्तू कोणत्याही शासकीय अनुदानाशिवाय दिमाखात उभी आहे. पुण्यातील पेशवे प्रतिष्ठानच्या माध्यमातून तेथे श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. त्यांच्या नावाने डुबेरे गावी एक वाचनालय व नागरी पतसंस्था आहे. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचे जन्मस्थळ पाहायला गेलो आणि पुन्हा एकदा इतिहासाची उजळणी करण्याची संधी प्राप्त झाली.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment