स्वामींच्या इच्छेने, त्यांच्या महासमाधीच्या एक वर्ष आधी स्थापन झालेला मठ
सोलापूर जिल्ह्याचे वैभव: स्वामी समर्थांच्या वास्तव्याने पावन झालेल्या अक्कलकोटमधील ऐतिहासिक 'राजेराय मठा'चा अलौकिक इतिहास!
'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हा धीर देणारा महामंत्र देणारे अक्कलकोटचे परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या अक्कलकोट नगरीत अनेक पवित्र स्थाने आहेत. या सर्व स्थानांमध्ये अनन्यसाधारण महत्त्व असलेले केंद्र म्हणजे श्री स्वामी समर्थ राजेराय मठ. स्वामींच्या इच्छेने, त्यांच्या हयातीत आणि त्यांच्या महासमाधीच्या एक वर्ष आधी म्हणजेच इ. स. १८७७मध्ये स्थापन झालेला हा मठ आज शेकडो वर्षांनंतरही लाखो भाविकांचे प्रमुख श्रद्धास्थान आणि ऊर्जाकेंद्र बनून राहिला आहे.
वास्तुकला आणि उत्सव
वटवृक्ष मंदिरापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर हा भव्य मठ दिमाखात उभा आहे. लाकडी कलाकुसरीने सजलेले गर्भगृह, उंच वज्रपीठावर विराजमान स्वामींच्या पादुका आणि उभी मूर्ती हे या मठाचे मुख्य आकर्षण आहे. मठात वर्षभर विविध उत्सव साजरे केले जातात. चैत्र वद्य त्रयोदशीला होणारा स्वामी समर्थ महाराजांचा १० दिवसीय पुण्यतिथी उत्सव, रथोत्सव, नवरात्रौत्सव आणि बेलानाथ बाबांचा पुण्यतिथी उत्सव मोठ्या उत्साहात पार पडतो. येथे दर्शनाची दारे भाविकांसाठी २४ तास खुली असून, दररोज मोफत भोजन आणि भक्तनिवासाची उत्तम सोय उपलब्ध आहे.
कडुनिंबाचा पाला अन् मिऱ्याने व्याधीमुक्त; स्वामींच्या आदेशाने मठाची उभारणी
अक्कलकोटला आल्यावर स्वामींनी शंकररावांना केवळ कडुनिंबाचा पाला आणि मिरे खाण्याची आज्ञा केली. स्वामींच्या या कृपेने अवघ्या १० दिवसांत शंकरराव पूर्णपणे व्याधीमुक्त झाले. या कृतज्ञतेपोटी त्यांनी स्वामीचरणी १० हजार रुपये अर्पण केले. त्या वेळी स्वामींनी या पैशांतून गावाबाहेरील श्रीराम मंदिराजवळ चुनेगच्ची मठ बांधून पादुकांची स्थापना करण्याचा आदेश दिला. स्वामींच्या आज्ञेनुसार शके १८००मध्ये (इ. स. १८७७) मध्ये माघ वद्य प्रतिपदेला या मठाचे काम पूर्ण होऊन दिव्य प्रकाशाच्या साक्षीने स्वामींच्या स्वहस्ते साचा तयार केलेल्या चैतन्य पादुका येथे स्थापन करण्यात आल्या.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment