श्री क्षेत्र धामंत्री येथील नागेश्वर महादेव मंदिर

वर्धा नदीच्या काठावरील प्राचीन वारसा

श्री क्षेत्र धामंत्री येथील नागेश्वर महादेव मंदिर मुख्य फोटो
श्री क्षेत्र धामंत्री येथील नागेश्वर महादेव मंदिर अतिरिक्त फोटो

वर्धा नदीच्या शांत आणि निसर्गरम्य काठावर वसलेले अमरावती जिल्ह्याच्या तिवसा तालुक्यातील श्री क्षेत्र धामंत्री हे नागेश्वर महादेव मंदिरासाठी संपूर्ण परिसरात प्रसिद्ध आहे. हिरवाईने नटलेला परिसर, प्राचीन वास्तुकला आणि आध्यात्मिक वातावरण यामुळे येथे येणाऱ्या भाविकांना विशेष शांततेचा अनुभव मिळतो. तिवसापासून सुमारे १४ किलोमीटर अंतरावर असलेल्या धामंत्री गावातून मंदिराकडे जाणारा मार्ग आहे.

हे नागेश्वर महादेव मंदिर हेमाडपंती शैलीत बांधलेले असून, धार्मिक आणि ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे आहे. महाशिवरात्री, तसेच श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी येथे दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी होते. येथे कालसर्प पूजेलाही विशेष महत्त्व असून, दूरदूरवरून भक्त येथे पूजा करण्यासाठी येतात. पेशव्यांच्या काळात इ. स. १६०७मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आल्याचे सांगितले जाते. राज्य शासनाने या मंदिराला ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जाही दिला आहे.

अमरावती जिल्हा व्यवस्थापक, अमृत 

Publisher: केदार दीपक गोगरकर News publisher name | Date: 29-05-2026 News publication date | Time: 10:48 AM News publication time | Views: 449 Number of times this news has been viewed | District: amaravati Related district of the news
Publisher: केदार दीपक गोगरकर News publisher name | Date: 29-05-2026 News publication date | Time: 10:48 AM News publication time | Views: 449 Number of times this news has been viewed | District: amaravati Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement