बदलापूरमधील लघुउद्योजकांची भेट
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे एप्रिल महिन्यात अमृत परिवार सर्वेक्षण करण्यात आले. अमृत ही संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. संस्थेच्या योजना लक्ष्यित गटातील जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचाव्यात, त्यांच्या अडचणी जाणून घ्याव्यात, याकरिता हे सर्वेक्षण करण्यात आले होते. ठाणे जिल्ह्यातील नोंद...
अमृत परिवार सर्वेक्षण करत असताना बदलापूर येथील पुरुषोत्तम बहुतुळे आणि भूपेंद्र कुंडले या लघुउद्योजकांची भेट झाली. त्यांनी बेकरी प्रशिक्षणाच्या नावाजलेल्या इन्स्टिट्यूटमध्ये प्रशिक्षण घेतल्यानंतर काही काळ दुबई येथे नोकरी केली. स्वतःचा काहीतरी उद्योग सुरू करण्याची त्यांची तीव्र इच्छा होती. या इच्छेला मूर्त रूप देऊन त्यांनी स्वतःची बेकर्स किचन कॅफे ही बेकरी सुरू केली. सुरुवातीला त्यांना कच्चा माल मिळवताना बऱ्याच अडचणी आल्या. परंतु आता ई-कॉमर्समुळे काम खूप सोपे झाले, असे त्यांनी सांगितले.
त्यांचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे पदार्थांच्या गुणवत्तेवर दिलेला भर. उत्तम दर्जाचा कच्चा माल ते वापरतात. त्यात ते कोणत्याही प्रकारची तडजोड करत नाहीत. किंमत ठरवल्यानंतर बाजारपेठ मिळणे कठीण झाले होते. परंतु गुणवत्तेवर दिलेला भर या वैशिष्ट्यामुळे साहजिकच त्यांची उत्पादने दर्जेदार असतात. त्यामुळे आता त्यांचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. मी स्वतःही त्यांच्या बेकरीतील उत्पादने घेतली असून, ती अत्यंत उत्तम दर्जाची आहेत हे त्या पदार्थांचा आस्वाद घेतल्यावर लक्षात आले. एकंदरीतच त्यांचा हा व्यवसाय उत्तम रीतीने चालला असून, सर्वेक्षणाच्या निमित्ताने तो व्यवसाय पाहता आला. अमृत बेकरी प्रशिक्षण कार्यक्रमाबद्दल कळल्यावर त्या उपक्रमात प्रशिक्षण देण्याची संधी मिळावी अशी इच्छा व्यक्त केली आहे. अमृतपेठ उपक्रमाबद्दल माहिती दिल्यावर त्यांनी त्यात रस दाखवला असून, लवकरच ते नोंदणी करणार आहेत.
माया रत्नपारखी-खेत्रे
ठाणे जिल्हा उपव्यवस्थापक, अमृत
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment