ब्राह्मण व्यक्तींचा बचत गट नव्या उद्योगासाठी उपलब्ध करून देतो ५० हजार रुपये

अमृत परिवार सर्वेक्षणात जळगावातील पहुर गावात नोंदवलेले निरीक्षण

ब्राह्मण व्यक्तींचा बचत गट नव्या उद्योगासाठी उपलब्ध करून देतो ५० हजार रुपये मुख्य फोटो
मुख्य फोटो

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे एप्रिल महिन्यात अमृत परिवार सर्वेक्षण करण्यात आले. अमृत ही संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. संस्थेच्या योजना लक्ष्यित गटातील जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचाव्यात, त्यांच्या अडचणी जाणून घ्याव्यात, याकरिता हे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्या वेळी जळगाव जिल्ह्यात नोंदवलेले हे निरीक्षण...

जळगाव जिल्ह्याच्या जामनेर तालुक्यातील पहुर हे गाव राज्याच्या राजकारणात प्रसिद्ध आहे. या गावात सर्वेक्षणासाठी गेलेलो असताना एक वेगळी गोष्ट पाहायला मिळाली. तेथे ब्राह्मण समाजातील काही व्यक्तींनी बचत गट स्थापन केला आहे. त्या माध्यमातून ते आपापसांमध्ये पैशांचे वाटप करतात. या गटाचे काम गेल्या पाच वर्षांपासून अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू आहे. त्याद्वारे ब्राह्मण समाजातील व्यक्तीला उद्योग उभारण्यासाठी ५० हजार रुपये दिले जातात. त्या व्यक्तीचा उद्योग व्यवस्थित सुरू झाला, की ती व्यक्ती पैसे परत करतात. त्यामुळे उद्योजकतेसाठी येणारी भांडवलाची अडचण काही प्रमाणात दूर होण्यास मदत होते. जयंत मुकुंद जोशी हे व्यवहार पाहत असतात.

(जळगाव जिल्हा व्यवस्थापक, अमृत)


Publisher: Rajendra Kanade News publisher name | Date: 20-05-2026 News publication date | Time: 06:33 PM News publication time | Views: 197 Number of times this news has been viewed | District: Jalgaon Related district of the news
Publisher: Rajendra Kanade News publisher name | Date: 20-05-2026 News publication date | Time: 06:33 PM News publication time | Views: 197 Number of times this news has been viewed | District: Jalgaon Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement