अमृत परिवार सर्वेक्षण - वैयक्तिक कर्ज व्याजपरतावा योजनेत रस

जळगाव जिल्ह्यातील काही नोंदी

अमृत परिवार सर्वेक्षण - वैयक्तिक कर्ज व्याजपरतावा योजनेत रस मुख्य फोटो
मुख्य फोटो

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे एप्रिल महिन्यात अमृत परिवार सर्वेक्षण करण्यात आले. अमृत ही संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. संस्थेच्या योजना लक्ष्यित गटातील जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचाव्यात, त्यांच्या अडचणी जाणून घ्याव्यात, याकरिता हे सर्वेक्षण करण्यात आले होते. जळगाव जिल्ह्यातील या काही नोंदी...

जळगाव जिल्ह्यातील यावल, रावेर, फैजपूर, सावदा या भागाला केळीचे पठार असे म्हटले जाते. या पंचक्रोशीत यावल शहर वसलेले आहे. यावल तालुक्यातील अट्रावल येथील जोशी कुटुंबाने मिरची आणि हळद कांडण्याचे मशीन घेऊन नवीन उद्योग सुरू केला आहे. त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यांना आपल्या उद्योगाचा विस्तार करायचा आहे. अमृत परिवार सर्वेक्षणासाठी गेलेलो असताना त्यांना अमृत वैयक्तिक कर्ज व्याजपरतावा योजनेची माहिती देण्यात आली. त्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक असल्याचे सांगितले. संस्थेच्या सर्व योजना समाजासाठी उपयुक्त असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले. भुसावळ तालुक्यातील खडके येथे काही जणांनी माहिती देण्यासाठी नकार दिला, असाही अनुभव आला.

(जळगाव जिल्हा व्यवस्थापक, अमृत)


Publisher: Rajendra Kanade News publisher name | Date: 20-05-2026 News publication date | Time: 06:22 PM News publication time | Views: 214 Number of times this news has been viewed | District: Jalgaon Related district of the news
Publisher: Rajendra Kanade News publisher name | Date: 20-05-2026 News publication date | Time: 06:22 PM News publication time | Views: 214 Number of times this news has been viewed | District: Jalgaon Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement