अमृत परिवार सर्वेक्षणातील नोंदी - नागपूर ग्रामीण

उमरेड, भिवापूर, कुही व मौदा परिसरातील ग्रामीण भाग

अमृत परिवार सर्वेक्षणातील नोंदी - नागपूर ग्रामीण मुख्य फोटो
अमृत परिवार सर्वेक्षणातील नोंदी - नागपूर ग्रामीण अतिरिक्त फोटो

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे एप्रिल महिन्यात अमृत परिवार सर्वेक्षण करण्यात आले. अमृत ही संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. संस्थेच्या योजना लक्ष्यित गटातील जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचाव्यात, त्यांच्या अडचणी जाणून घ्याव्यात, याकरिता हे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यातील काही अनुभव....

अमृत परिवार सर्वेक्षण अभियानाची सुरुवात आठ एप्रिल २०२६पासून करण्यात आली. सर्वेक्षणात माझ्याकडे उमरेड, भिवापूर, कुही व मौदा परिसरातील ग्रामीण भागात प्रत्यक्ष भेट देण्याची जबाबदारी देण्यात आली. या भेटींमध्ये गावातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, नगरपंचायत पदाधिकारी, तसेच स्थानिक प्रमुख व्यक्तींशी संवाद साधून सर्वेक्षणाची माहिती देण्यात आली. गावातील नागरिकांशी थेट संपर्क साधून त्यांच्याकडून आवश्यक माहिती गोळा करण्यात आली.

गावांमध्ये जनजागृतीसाठी पोस्टर्स लावण्यात आली. प्रत्यक्ष भेटी घेऊन नागरिकांना अभियानाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. त्याच्या भविष्यातील उपयुक्ततेबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. सर्वेक्षणातून माहिती अचूक आणि व्यवस्थित पद्धतीने संकलित करण्यावर विशेष भर देण्यात आला.

प्रक्रियेला गावांमधून चांगला प्रतिसाद मिळाला. अनेक नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवला. काही ठिकाणी विशेष उत्साह दिसल्यामुळे कार्य अधिक प्रभावीपणे पार पाडता आले. सर्वेक्षणामुळे गावांमध्ये एक सकारात्मक वातावरण निर्माण झाले आणि समाजातील विविध घटकांमध्ये संवाद वाढला. काही भेटींमध्ये असे लक्षात आले, की त्या गावामध्ये संस्थेच्या लक्ष्यित गटातील लोकच नाहीत. काही जागी प्रवासादरम्यान त्रास झाला; पण गावागावांमध्ये संपर्क वाढला, त्याचा आनंद आहे. 

एकूणच, अमृत परिवार सर्वेक्षण अभियान यशस्वीरीत्या राबवण्यात आले असून, या उपक्रमामुळे ग्रामीण भागात मजबूत संपर्क जाळे निर्माण झाले आहे. भविष्यात या सर्वेक्षणातून मिळालेल्या माहितीचा उपयोग करून अधिक प्रभावी आणि व्यापक कार्य करता येईल, असा विश्वास आहे. सर्वेक्षण करताना लक्ष्यित गटातील नागरिक असलेल्या सुमारे ६५ ग्रामपंचायतींना व एकूण जवळपास ८० गावांमध्ये भेटी देण्यात आल्या. त्यांचे संपर्क क्रमांक आणि अन्य माहिती गोळा करण्यात आली.

निखिल देशपांडे

अमृतमित्र, नागपूर

Publisher: Harshal Gadre News publisher name | Date: 07-05-2026 News publication date | Time: 01:41 PM News publication time | Views: 254 Number of times this news has been viewed | District: Nagpur Related district of the news
Publisher: Harshal Gadre News publisher name | Date: 07-05-2026 News publication date | Time: 01:41 PM News publication time | Views: 254 Number of times this news has been viewed | District: Nagpur Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement