विविध स्तरांवर प्रभावी काम केल्यामुळे अमृत परिवार सर्वेक्षण झाले यशस्वी

नागपूर शहरातील दक्षिण-पश्चिम विभागातील सर्वेक्षण करतानाच्या नोंदी

विविध स्तरांवर प्रभावी काम केल्यामुळे अमृत परिवार सर्वेक्षण झाले यशस्वी  मुख्य फोटो
मुख्य फोटो

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे एप्रिल महिन्यात अमृत परिवार सर्वेक्षण करण्यात आले. अमृत ही संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. संस्थेच्या योजना लक्ष्यित गटातील जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचाव्यात, त्यांच्या अडचणी जाणून घ्याव्यात, याकरिता हे सर्वेक्षण करण्यात आले होते. नागपूरमधील या काही नोंदी....

अमृत परिवार सर्वेक्षण आठ एप्रिल २०२६पासून सुरू करण्यात आले. त्या अंतर्गत माझ्याकडे नागपूर शहरातील दक्षिण-पश्चिम विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. सर्वेक्षणाच्या कालावधीत विविध स्तरांवर प्रभावी काम करण्यात आले. स्थानिक पातळीवर घरभेटी घेऊन प्रत्यक्ष फॉर्म भरून माहिती संकलन (डेटा) करण्यात आले. त्यामुळे माहिती अधिक अचूक आणि विश्वसनीय स्वरूपात मिळाली.

या उपक्रमामध्ये अनेक महत्त्वाच्या व्यक्तींशी संपर्क साधण्यात आला. विविध भाग संघचालक, नगर संघचालक आणि प्रमुख व्यक्तींशी भेटी घेण्यात आल्या. या भेटींमध्ये त्यांनी भागानुसार खुल्या प्रवर्गातील नागरिकांची बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले. तसेच, अमृत परिवार व त्याच्या योजनांची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याबद्दलही त्यांनी सांगितले. विशेषतः लक्ष्मीनगर झोनमध्ये नवउद्योजक होऊ इच्छिणाऱ्यांसाठी स्वतंत्र बैठक आयोजित करण्यात येईल, असेही त्यांनी नमूद केले. नागपूरमधील नामवंत नागरिकांशी चर्चा करून त्यांना अमृत परिवार सर्वेक्षण आणि त्याच्या उद्दिष्टांविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. या संवादात समाजातील विविध घटकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला.

नागपूर शहरातील प्रत्येक विभागानुसार प्रमुखांची बैठक घेण्यात आली. त्यांच्या कार्यालयाबाहेर अमृत परिवार सर्वेक्षणाचे स्टिकर्स लावून जनजागृती करण्यात आली. या बैठकीत अमृत संस्थेच्या विविध योजनांची माहिती देऊन त्या अधिक प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचवण्याबाबत चर्चा करण्यात आली.

महानगरपालिका स्तरावरही समन्वय साधण्यात आला. सहायक आयुक्तांसह बैठक घेण्यात आली. या बैठकीत अमृत जनगणनेविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच मराठा आरक्षणासंदर्भातील माहिती एक्सेल फाइल स्वरूपात त्यांनी उपलब्ध करून दिली. ती पुढील विश्लेषणासाठी उपयुक्त ठरणार आहे.

संपूर्ण सर्वेक्षण प्रक्रियेत नागरिकांशी थेट संवाद साधल्यामुळे अमृत संस्थेच्या योजनांबद्दल सकारात्मक विचार समाजात असल्याचे दिसून आले. लोकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन सर्वेक्षणात सहभाग नोंदवला. नागपूरच्या दक्षिण-पश्चिम विभागात प्रभावीपणे काम पूर्ण करण्यात आले. स्थानिक पातळीवरील भेटी, अधिकारी व मान्यवरांशी समन्वय, तसेच जनजागृती उपक्रम यांच्या माध्यमातून सर्वेक्षण यशस्वी ठरले. संकलित केलेली माहिती भविष्यातील नियोजन आणि अमृत संस्थेच्या योजनांच्या अंमलबजावणीसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल.

वृषाली सवनकर

नागपूर जिल्हा उपव्यवस्थापक, अमृत

Publisher: Harshal Gadre News publisher name | Date: 07-05-2026 News publication date | Time: 01:30 PM News publication time | Views: 370 Number of times this news has been viewed | District: Nagpur Related district of the news
Publisher: Harshal Gadre News publisher name | Date: 07-05-2026 News publication date | Time: 01:30 PM News publication time | Views: 370 Number of times this news has been viewed | District: Nagpur Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement