अमृत परिवार सर्वेक्षणातील नोंदी - नागपूर

नागपूर पूर्व आणि नागपूर उत्तर

अमृत परिवार सर्वेक्षणातील नोंदी - नागपूर मुख्य फोटो
मुख्य फोटो

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे एप्रिल महिन्यात अमृत परिवार सर्वेक्षण करण्यात आले. अमृत ही संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. संस्थेच्या योजना लक्ष्यित गटातील जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचाव्यात, त्यांच्या अडचणी जाणून घ्याव्यात, याकरिता हे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यातील काही अनुभव....

अमृत परिवार सर्वेक्षण अभियान ८ एप्रिल ते २९ एप्रिल २०२६ या कालावधीत करण्यात आले. या सर्वेक्षणात माझ्याकडे नागपूर पूर्व व नागपूर उत्तर हे भाग प्रत्यक्ष भेटीकरिता देण्यात आले होते. या भागांमध्ये कार्य करताना भाग संघचालक, नगर संघचालक, नगरसेवक, तसेच विविध प्रतिष्ठित व्यक्ती यांच्याशी संपर्क साधण्यात आला. लक्ष्यित गटातील व्यक्तींशी संवाद साधून त्यांना सर्वेक्षणाचे उद्दिष्ट व महत्त्व समजावून सांगण्यात आले.

या कालावधीत नागपूर महानगरपालिकेचे सहायक आयुक्त यांच्यासह बैठक घेण्यात आली. या बैठकीत त्यांनी जनगणनेसंदर्भातील बैठकीत अमृत सर्वेक्षणाची माहिती दिल्याचे सांगितले. तसेच, मागील मराठा आरक्षण संदर्भातील काही माहिती व एक्सेल फाइल स्वरूपातील डेटा उपलब्ध करून देण्यात आला. त्याचा सर्वेक्षणाच्या कामात उपयोग झाला. याशिवाय, स्थानिक स्तरावर संपर्क वाढवून कार्य अधिक प्रभावीपणे राबवण्याचा प्रयत्न करण्यात आला. विविध स्तरांवरील समन्वय साधत आवश्यक माहिती संकलित करण्यावर भर देण्यात आला.

या संपूर्ण प्रक्रियेत काही ठिकाणी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद मिळाला, तर काही ठिकाणी कमी प्रतिसाद मिळाला किंवा मिळालाच नाही. विशेषतः नागपूर उत्तर भागात प्रतिसाद तुलनेने कमी असल्याचे आढळून आले. एकूणच, अमृत परिवार सर्वेक्षण अभियान राबवताना विविध स्तरांवर अनुभव मिळाले. या सर्वेक्षणातून मिळालेल्या माहितीचा उपयोग भविष्यात अधिक प्रभावी नियोजनासाठी करता येईल, असा विश्वास आहे.

प्रतीक आकरे

नागपूर जिल्हा उपव्यवस्थापक, अमृत

Publisher: Harshal Gadre News publisher name | Date: 06-05-2026 News publication date | Time: 12:59 PM News publication time | Views: 196 Number of times this news has been viewed | District: Nagpur Related district of the news
Publisher: Harshal Gadre News publisher name | Date: 06-05-2026 News publication date | Time: 12:59 PM News publication time | Views: 196 Number of times this news has been viewed | District: Nagpur Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement